![]() |
शहीद दत्तात्रेय माधवा सत्रे (०६/०२/२०१५) |
जयहिंद मित्रांनो
मी आज तुम्हाला एका माझ्या खास मित्राची व आमच्या पंचक्रोशीच्या शुर हुतात्म्याची शौर्यगाथा सांगणार आहे. दत्तात्रेय माधवा सत्रे यांचा जन्म एका साध्या शेतकरी कुटुंबात सत्रेवाडी या छोट्याशा खेडेगावात झाला घरची परिस्थिती खुपच गरिब आई वडिलांबरोबरच दोन मोठे भाऊ दिलीप व विलास व एक मोठी बहीण ऊषा दत्ता सर्वात छोटा. माझे आजोळ सत्रेवाडी असल्यामुळे मी दत्ताला लहानपणापासुनच चांगले ओळखायचो. सुरवातीपासुनचे दत्ताचे जीवन खुपच संघर्षमय होते. दत्ताचा स्वभाव खुपच शांत व मनमिळाऊ होता या स्वभामुळेच तो लहानांपासुन थोरापर्यंत सर्वांचा लाडका होता. गावातले सर्वजण त्याला प्रेमाने दत्तोबा याच नावाने बोलवायचे.
दत्ताचे पहिली ते चौथीपर्यंत चे शिक्षण जिल्हा परिषद शाळा सत्रेवाडीतच झाले तीथुन पुढे खरा संघर्ष सुरू झाला. कारण पुढच्या शिक्षणासाठी तब्बल तीन किलोमिटरचा तुटक्या फुटक्या रस्त्याने प्रवास करुन मलवडीला यावे लागायचे ते पण चालतच. हायस्कूलचे शिक्षण आम्ही दोघांनी मलवडीतच पुर्ण केले तेव्हापासुनतर तो मला एकदम जवळचाच झाला. काॅलेजसाठी दोघेपण दहिवडीला प्रवेश घ्यायला गेलो. आम्हा दोघांचे पण लहानपणापासुचे जिवन खुपच संघर्षमय असल्याने समझदार झाल्यापासुन दोघांची पण खुप मनस्वी इच्छा होती ती म्हणजे फौज मधे भर्ती होण्याची. म्हणून त्याने दहिवडी काॅलेज दहिवडीला कला शाखेतुन प्रवेश घेतला त्याच्याबरोबर आमच्या मलवडीतले पण खुप जण होते आमचे मोठे बंधु दादा जगदाळे, बक्सार मुलाणी त्यावेळी आमच्या साठी बक्या हे नाव असायचे जे आज नाशिकला जेल अधीक्षक आहेत अजून बापु शिंदे, डोंगर्या, धया, अमोल घाडगे आणि स्वतः मी असे बरेचजण आम्ही एकत्र येत जात होतो. यासर्वांमधे सुद्धा दत्ताच सर्वात शांत स्वभावाचा होता. यातल्या आम्ही 5 जणांनी काॅलेजला NCC जाॅयन केली.आणि खास म्हणजे मला NCC मधे जो प्रवेश मिळाला तो केवळ दत्तामुळेच कारण सिलेक्शन च्या दिवशी मी काॅलेजला न्हवतो त्याने नंतर रिक्वेस्ट करुन मला प्रवेश दिला.NCC मधे सुधा वेगवेगळ्या क्राॅस कंट्री, ड्रिल स्पर्धा मधे दत्ता अव्वल असायचा. तेरावी चे काॅलेज व NCC ची तीन वर्षे पुर्ण होन्याआधीच दत्ता भरती पुर्व प्रशिक्षण अकॅडेमी बहादुरवाडीला गेला, व आॅगस्ट 2005 ला अखेर घरच्यांच्या पुंन्याईला व त्याने केलेल्या प्रयत्नाला यश आले आणि आसाम रायफल मधे RFN/GD या पदावर भर्ती झाला. ट्रेनिंग पुर्ण करुन दत्ताने ड्यटी जाॅयन केली चांगलांग अरुणाचल प्रदेश ला 14 आसाम रायफल मधे त्याचे पोस्टींग झाले. तो ईलाका तसा फारच भयानक होता. घनदाट जंगल अधुन मधुन काहीना काही घटना घडायच्याच अशा ठिकाणी दत्ताचे पोस्टिंग होते पण तो कधी मागे सरकला नाही.
आता नोकरी लागल्यामुळे घरच्यांना वाटले दोनाचे चार हात करावेत म्हणुन 2008 साली भुरकवडी तालुका खटाव येथील आश्विनी यांच्याशी त्याचा विवाह लाऊन दिला. देवाच्या कृपेने दोन मुले पण झाली मुलगी मानसी व मुलगा प्रेम सर्व काही व्यवस्थित चालले होते. पण अचानक कोणाची तरी नजर लागल्यासारखेच झाले. काही दिवसांनी वडिलांचे दिर्घ आजारामुळे निधन झाले त्यामुळे तो खचुन गेला कारण आधार तुटला होता. त्यानंतर या दुखातुन कसाबसा तो शांत झाला होता. पण आता त्याच्यावरच दुर्दैव चालुन आले होते कारण डिसेंबर 2014 ला तो सुटी आला होता व 16 जानेवारी 2015 ला माघारी जाणार होता . मी स्वतः त्याला जायच्या आदल्या दिवशी मलवडीत भेटलेलो खुप वेळ बोलत पण बसलेलो तो पण जाताना पहिल्यांदाच सर्वांच्या अशा भेटी घेऊन गेला जसे एखादे कायमचे कुठेतरी जाताना घेते. तसा तो प्रत्येक सुटीत न चुकता सर्वांच्या गाठी घेऊन जायचा पण यावेळी जरा वेगळाच भाव होता त्याच्या चेहर्यावर.
सुटीवरुन माघारी पोहचला. त्याच्या युनिटमधे पण स्वतःच्या मनमिळाऊ स्वभावाने त्याने छोट्या रॅन्क पासुन ऑफिसर पर्यंत सर्वांचे मन जिंकले होते. पण बोलतात ना "जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला" एक दिवस तो काळा दिवस अखेर उगवलाच 2006 पासुन दत्ता 14 आसाम रायफल चांगलांग मधेच होता चांगलांग हा इलाखा भारत मॅनमार च्या सिमेवरती दुर्गम भागात व घनदाट जंगलात होता. असाम रायफल हे खातेच असे आहे की ज्यामधे आसाम व त्या शेजारील इलाका सोडुन दुसरिकडे कुठेच पोस्टींग होत नाही. खरे म्हणजे कोणत्याही मनुष्याचा काळ येतो तेव्हा तो मनुष्य जिथे असेल तीथुन आपोआपच काळाजवळ जाऊन पोहचतो दत्ताच्या बाबतीत ही असेच काही घडले कारण फौजच्या युनिटमधे वेगवेगळ्या कंपन्या किंवा टुकड्या आसतात हा पण एका टुकडीत होता व दुसर्या टुकडीत ड्यूटीला जवान कमी होते म्हणुन दत्ताला सुटीवरुन रिपोर्ट केल्या केल्या त्या टुकडीत ड्यूटीसाठी पाठवले. फौज मधे कितीही तकलीफ होत असली किंवा इच्छा होत नसली तरी नाईलाजाने ऑर्डर ऐकावीच लागते त्यामुळे दत्ता दुसर्या टुकडीत ड्यूटी साठी गेला जी चांगलांग च्या "मोनमाऊ" या अतिशय घनदाट जंगलात होती तीथे रोज संध्याकाळी पेट्रोलिंग ड्यटी साठी जंगलात जावे लागायचे. आणि हीच ती काळ्या दिवसाची सुरवात नेहमीप्रमाणेच कोणाच्या ध्यानी ना मनी 5 फेब्रुवारी 2015 ला संध्याकाळी जेवन करुन पॅक लंच घेऊन 9 जणांची गश्त पार्टी (पेट्रोलींग ड्यटी) नि
घाली बरोबर तीथले 2 सिवील गाईडस पण होते रस्ता दाखवन्यासाठी रात्रभर चालत चालत गश्त पार्टी कॅम्प पासुन खूपच लांब व आत घनदाट जंगलात गेली होती त्यादिवशी 6 फेब्रुवारी शनिवार होता जे जेवन डबा बांधून आणले होते ते सर्वांनी एक एक करुन खाल्ले. व पुन्हा पेट्रोलींग ड्यटीसाठी पुढे चालु लागले त्या ईलाक्याला मोनमाऊ असे म्हणतात भारत आणि म्यानमार च्या सिमेवर असलेले अतीशय धोकादायक ठिकाण.
किररर घनदाट जंगल आसपास दुरदुरपर्यंत लोकवस्ती कुठेच नाही कॅम्प मधुनच ते जवळ जवळ 16 ते 17 तास चालत आलेले नऊ जनांच्या ट्रुप मधे दत्ता सर्वात पुढे होता.
सकाळचे 11 वाजले होते व अचानक जे रस्ता दाखवणारे गाईडस होते त्यांचा पाय जमिनीत दबऊन ठेवलेल्या I.E.D.(Improvised Explosive Device) वर पडला मग काय त्यांच्या मागे प्रथम आपला दत्ताच होता. जसा पाय पडला डोळ्याची पापणी लवते ना लवते त्याआधीच एक भयंकर ब्लास्ट झाला ब्लास्ट एवढा जबरदस्त होता की त्यामधे सर्वजण इतरत्र फेकले गेले. जे गाईडस होते त्यांचातर जाग्यावरच चुरा झाला. त्यांच्यामागेच आपला दत्ता असल्यामुळे बाकी 8 जणांपेक्षा जरा जास्तच मार लागला. जास्त म्हणजे दत्ताचा एक पाय मांडीपासुन खाली तुटला गेला आवाजामुळे काहीजणांचे कान फुटले व जख्मी पण झाले दत्ताचा पाय तुटल्यामुळे खुपच रक्त वाहु लागले होते तरी पण त्याने धीर सोडला न्हवता. ब्लास्ट मुळे जी संपर्कासाठी उपकरणे असतात ती पण फुटली गेलेली त्यातील एक वायरलेस कसाबसा चालु करुन ट्रुप कमांडरने संपर्क करायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी पण झाला परंतु जीथे व्हायला पाहीजे होता तीथे न होता दुसर्याच कॅम्प मधे झाला पुन्हा त्या कॅम्प वाल्यांनी दत्ताच्या कॅम्प मधे ही माहिती कळविली तेव्हा दुपारचा 1 वाजलेला.इकडे दत्ताचा पाय तुटल्यामुळे तो खुपच तळमळत होता आसपास पानी सुद्धा न्हवते. दत्ताचे रक्त सांघळतेय हे पाहुन एका सरदारजीने आपली पगडी काढुन दत्ताच्या पायाला बांधली जेणेकरुन रक्त थांबेल रक्त थांबले पण वेदनांनी तो व्याकुळ झालेला कोणीच त्याला घेऊन जायच्या आवस्थेत न्हवते.इकडे कॅम्प मधे समजल्या समजल्या हेलिकॉप्टर साठी कळविण्यात आले कारण तिथे गाडी वगेरे काहीच जात नाही. जीथे ही घटना घडली होती तीथे हेलीकाप्टर पोहचले सुध्दा ते पाहुन सर्व जवानांचा जिवात जीव आला की आता आपणाला घेऊन जातील पण जंगल एवढे घनदाट असल्यामुळे हेलीकाप्टर ऑपरेटरला निच्छीत जागा समजेना खाली जे जख्मी जवान होते त्यांनी आग लाऊन धुर पण केला त्यांना समजन्यासाठी पण झाडी एवढी किररर होती त्याच्यातुन धुर वरती पोहोलाच नाही. एकदा नाहीतर दोनदा हेलीकॉप्टर हताश होऊन माघारी आले.इकडे दत्ताची तळमळ चालुच होती आहो विचार करा ठेस न्हवती लागली तर पाय तुटलेला. मग विचार करा... हेलीकाप्टर हताश होऊन आल्यामुळे कॅम्प मधुन स्ट्रेचर वगेरे घेऊन रेस्क्यू साठी चालत पार्टी निघाली. पहिल्यांदा ते पण रस्ता चुकले नंतर मुख्य रस्त्त्ताने चालले.इकडे दत्ताच्या वेदना असाहाय्य झालेल्या खुप तळमळत होता मला घेऊन चलारे असेपण बोलला खुपवेळा पण घेऊन जाणार कोण सगळेच जख्मी शेवटी कंपलीट साडे पाच तास मृत्यशी झुंज देऊन दत्ताने सायंकाळी साडे चारच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.😒 जोपर्यंत कोणी न्ह्यायला येत नाही तोपर्यंत या बाकीच्यांच्या जवळ पण काहीच पर्याय न्हवता.बचावासाठी निघलेली पार्टी रविवारी 8 तारखेला त्या ठिकाणावर पोहचली जीथे ब्लास्ट झालेला.तीथुन त्या सर्वांना कॅम्प मधे आणता आणता रात्र झाली.कॅम्प मधे पोहचल्यावर सर्वांना गाडीत टाकुन डिब्रूगढ च्या कमांड हास्पिटल मधे हलविण्यात आले. तीथे डाॅक्टर ने पण दत्ता संपला म्हणून घोषित केले.तीथेच दत्ताचे पोस्टमार्टम करुन स्पेशल गार्ड द्वारे सलामी देऊन 9 तारीख सोमवारच्या फ्लाईटने पार्थिव मलवडी साठी रवाना झाले. दिब्रुगढ ते कोलकाता व तिथुन पुणे असा प्रवास करत 9 तारखेला सोमवारी रात्री 12 वाजता आम्ही दत्ताचे पार्थिव घेऊन पुन्यात पोहचलो बरोबर एक JCO व दोन रायफल मॅन गंगाराम गडकरी व गायकवाड यांना पाठवन्यात आले होते9 तारखेला रात्री पुणे एयरपोर्ट ला पोहचल्या पोहचल्या एयरपोर्ट च्या बाहेर बाॅम्बे इंजीनियर ग्रुपच्या वतीने गार्ड आफ हाॅनर देण्यात आले व तीथुन अॅम्बुलन्स च्या मदतीने पार्थिव सातारा-दहिवडी-मलवडी-सत्रेवाडी साठी हलवण्यात आले.तब्बल 5 दिवसानंतर दत्ताचे पार्थिव मलवडी-सत्रेवाडीत पोहचले.शहिद दत्ता अमर रहे च्या जयघोषात दत्ताचे पार्थीव पुष्पचक्राने सजऊन सत्रेवाडीत पोहचले. तीथे विधीवत व कोल्हापुर वरुन आलेली टेरोटेरियल आर्मीची गार्ड व दहिवडी पोलिसांच्या वतीने शासकीय इतमामात शेवटची सलामी व निरोप देऊन अंत्यविधी करन्यात आला.झाले गेला त्यादिवशी एका आईचा गुणी मुलगा, भावांचा लाडका छोटु, एका पत्नीचा शूर पती, दोन मुलांचा आवडता बाबा, सर्व गावाचा दत्तोबा, आणि आमचा खास जिवलग गेला पण सर्वांच्या मनावर काहीतरी छाप उठवून गेला. म्हणून एक गाणे आठवले "जिंदगी तो बेवफा हैं एक दिन ठुकारायेगी मौत मेहबूबा हैं अपने साथ लेकर जायेगी मरके जिने कि अदा जो दुनिया को शिखलायेगा वो मुकद्दर का सिकंदर जानेमन केहलायेगा" फौजीचे पण असेच असते कारण ते केव्हाच मरत नाहीत तर कायम "शहीद" राहतात. तभी तो "मरकर भी जीनेवालोंको ये जमाना हमेशा शहीद केहता हैं" खुप आठवतोरे भावा तु.

सलाम तुझ्या शौर्याला.
ही आहे दत्ताची शौर्यगाथा

No comments:
Post a Comment